बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज पासून भाविकांचा लाडका बाप्पा आणि आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे घरोघरी आगमन होतेय. सकाळपासूनच गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. यंदा 1200 सार्वजनिक गणेश मंडळांकडून बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना होत असून, बुलढाणा उपविभागामध्ये जवळपास 200 सार्वजनिक मंडळे बाप्पांची स्थापना करतात.यामध्ये ग्रामीण भागात 120 तर शहरी भागात 80 मंडळांचा समावेश असतोय तर 82 ठिकाणी ‘एक गाव एक’ गणपतीची स्थापना होईल.
आज 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी!महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सवाची आजपासून प्रारंभ होतोय.या मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात आगमन करून त्यांची विधिवत पूजा करण्यासाठी उत्सवप्रिय बुलढाणेकर सज्ज झालेत. आज सकाळ पासूनच गणेशभक्तांची चौका चौकात गर्दी होत आहे. काल रात्री उशिरापर्यंत गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात गणेश भक्त तल्लीन होते.अजूनही सजावटीचे काम सुरू असून आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचं वाजत गाजत आगमन होणार होणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा देखील या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतर्क झाली आहे.