बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकावर आधारित राज्यस्तरावर रँकिंग करण्यात येते. 2024 या वर्षात जुलै महिन्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय बुलढाणा सपशेल नापास झाल्याची लाजिरवाणी बाब समोर आली आहे. बुलढाण्याला केवळ 30 टक्के गुणांकन मिळाले आहे.यावरून जिल्हा सामान्य रुग्णालयाची व बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांची आरोग्य सेवा किती चांगली आहे? यावर शिक्कामोर्तब होत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आरोग्य कार्यक्रमांचे रँकिंग करण्यात येत असते.यामध्ये आरोग्य कार्यक्रमांमधील महत्त्वाचे निर्देशांक तपासण्यात येते. जुलै महिन्यातील रँकिंगचे पत्र 5 सप्टेंबरला धडकले.यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना राज्यस्तरावर केवळ 30% गुणांकन मिळाले आहे.आरोग्य कार्यक्रमांमधील महत्त्वाचे निर्देशांक तपासण्यात येत असतांना जिल्हा, तालुका अधिकाऱ्यांच्या
समन्वयाने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक यांचे पर्यवेक्षण व गावस्तरावर कार्य करणारे आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,फार्मासिस्ट,सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,
आशा सेविका यांची लोकांना दिलेली गुणात्मक सेवा व त्याकामांचे अहवाल करणारे डाटाएन्ट्रीऑपरेटर,तालुका स्तरीय
कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कार्यक्रम समन्वयक,जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांनी कशा प्रकारे सादरीकरण केले? हे तपासल्या जाते.मात्र बुलढाणा जिल्ह्याची रँकिंग अत्यंत लाजिरवाणीआहे. राष्ट्रीय आरोग्य निर्देशांकावर सुधारणा करण्यावर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.










