spot_img
spot_img

एअरटेल टावरच्या केबलसाठी खोदलेल्या रस्त्याची लागली वाट! -लाखो रुपयांच्या रस्त्याचे भवितव्य धोक्यात! -खड्ड्यांमुळे नागरिक हैराण!

लोणार(हॅलो बुलढाणा/यासीन शेख) एअरटेल कंपनीच्या टावरसाठी केबल टाकण्याकरिता खोदलेल्या नालीची ठेकेदाराने व्यवस्थित दबाई केली नाही.लाखो रुपयांचा रस्ताच खोदून काढला. आता या रस्त्याचे भवितव्य धोक्यात आले नव्हे तर होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या जीवावर देखील गदा आली आहे.

लोणार शहरात आठ दिवस आधी एअरटेल टॉवर कंपनीने आपले केबल टाकण्यासाठी मंठा रोड पासून माळीपुरा, गुलाबखा मोहल्ला या रस्त्याने नाली खोदली.एअरटेल च्या टावर पर्यंत केबल लाईन टाकण्यात आली. या रस्त्यावर आधीच भूमिगत गटार पाईपलाईन खोदण्यात आली होती.त्यावर भरीसभर म्हणून टॉवरची केबल टाकण्यासाठी आणखी रस्ता खोदण्यात आला.भूमिगत गटार ठेकेदारांनी रस्त्याची व्यवस्थित दवाई केली होती.परंतु एअरटेलच्या ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे व भगदाड पडले आहे.रस्त्याचा पूर्णता धिंगाणा करून टाकला.या रस्त्यावर अपघात घडत आहे.रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कामगाराला सांगितले असता कामगार आठ दिवसात खड्डे बुजवितो असे सांगून वेळ मारून नेत आहे.सदर खड्डे तात्काळ बूजविण्यात यावे,अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!