सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा / संतोष जाधव) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू असून तूपकर यांची प्रकृती खालावली आहे.दरम्यान आंदोलन स्थळी जाऊन जय शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष जहीर खान पठाण यांनी आंदोलनाला पाठिंबा देत रस्त्यावर उतरण्याची तुपकर यांना ग्वाही दिली.
शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून संघटना व शेतकरी रस्त्यावर उतरून निवेदन, विविध आंदोलन, निषेध करीत आहेत.दरम्यान आज 6 सप्टेंबर रोजी जय शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष जहीर खान पठाण,शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी जय शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष यांनी ‘वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत.’ अशी तुपकरांना ग्वाही दिली.