spot_img
spot_img

EXCLUSIVE- रविकांत तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकऱ्यांनी सुरू केले जलसमाधी आंदोलन!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झणके) रविकांत तुपकर यांच्या अंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून व त्यांच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने आज मलकापूर तालुक्याच्या वतीने जांभूळधाबा येथे शेतकऱ्यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य करा अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

सिंदखेडराजा येथे सुरू असलेल्या रविकांत तुपकर यांच्या अंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून आज मलकापूर तालुक्याच्या वतीने जांभूळधाबा येथे समस्त शेतकऱ्यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, कापसाला 12000 रुपये भाव मिळाला पाहिजे,सोयाबीनला 8000 रुपये भाव मिळावा,
शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळावा
अशा विविध मागण्यासाठी आज जल समाधी आंदोलन सुरू करण्यात आले. शासनाने या अंदोलनाची दखल घेऊन रविकांत तुपकर यांच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर सोडवाव्यात अन्यथा संपूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागेल अशी मागणी आज शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली. यावेळी शेतकरी चळवळीतील सचिन शिंगोटे, हर्षल मोरे, विश्वनाथ वाहाले, प्रवीण बावस्कार, परमेश्वर मोरे ,वैभव गावंडे , सोपान इंगळे, अजय भिलारे,देवानंद जवरे, संतोष सपकाळ, विजय राणे हे हजर होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!