बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तूपकरांची तब्येत खालावली असून,त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने ते अस्वस्थ दिसून येत आहेत.
दरम्यान शेतकरी नेते रविकांत तूपकरांच्या समर्थनार्थ गावागावातील शेतकरी आता बाहेर पडत असून, आंदोलनाचा वनवा पेटण्याची शक्यता बळावली आहे.रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला राज्यात ठिक-ठिकाणी पाठिंबा मिळत असून, बुलढाण्या प्रमाणेच वाशिम, वर्धा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर या जिल्हयामध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदने देवून रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.आज अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मात्र तूपकरांची तब्येत खालावली असून ते अस्वस्थ दिसून येत आहेत.












