spot_img
spot_img

‘अभी रौशन हुआ जा रहा है रास्ता.. वो देखो एक नारी आ रही है!’ -शिवसेना नेत्या प्रेमलता सोनोने जपताहेत जनसंवाद यात्रेचे ‘अस्तित्व!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना नेत्या प्रेमलता सोनोने यांनी चार सप्टेंबर पासून जनसंवाद यात्रेला पिंपळगाव देवी येथून प्रारंभ केला. तळागाळातील घटकांशी ते संवाद साधत असून त्यांच्या प्रश्नांचा गुंता सोडविण्यासाठी त्या प्रयत्नशील दिसतात.

‘अस्तित्व ‘ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गेली 25 वर्ष वंचित घटकांना न्याय देण्यासाठी घालविलीत.विशेष म्हणजे त्यांची आंदोलने अभिनव ठरली.मुंडन आंदोलन, लोटांगण आंदोलन, शोले आंदोलन,विना छत्र आंदोलन, बॉटल बैठो आंदोलन,चरण धरण आंदोलन, शौचालय बंदिस्त आंदोलन अशी त्यांची आंदोलने शोषित पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरली.महिला चळवळीत त्या ताकदीने उतरल्या असून,युवक,
युवती व शेतकऱ्यांसाठी संघर्ष करताना दिसतात.आता प्रेमलता सोनोने यांनी पिंपळगाव देवी येथून जनसंवाद यात्रेचा प्रारंभ केला आहे.सकाळ असो वा संध्याकाळ त्यांनी पायाला भिंगरी बांधून तळागाळातील वंचित घटकांच्या गाठीभेटी घेण्याला सुरुवात केली.यात्रेदरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महिलांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, युवकांच्या, युवतीच्या समस्या जाणून घेत त्या अभ्यासपूर्ण संवाद साधत आहेत.या संवाद यात्रेत ‘अभी रौशन हुआ जा रहा है रास्ता..
वो देखो एक नारी आ रही है!’ असा सूर उमटायला लागला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!