बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्या गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवासाठी पेणच्या शाडुमातीच्या मुर्ती प्रसिध्द आहे. बुलढाण्यात पेणच्या सुप्रसिध्द मुर्ती शुभारंभ गणेश मुर्ती दालनात म्हणेजच रेणुका मंगल कार्यालयात उपलब्ध झाल्या आहेत.650 पेक्षा जास्त विविध रूपांमधील गणेशमुर्तींचे हे दालन गणेश भक्तांना आकर्षित करीत आहे.अनेक पर्यावरण स्नेहींनी या शाडू मातीच्या बाप्पांना घरी नेले आहे.प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या तरी शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने भाविकांचा कल शाडू मातीच्या मूर्ती बुक करण्याकडे दिसून येत आहे. सदर दालनातील अनेक मूर्तीचे बुकिंग झाले असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीच्या तुलनेत शाडू मातीची मूर्ती काही तासाच्या आत पूर्ण विरघळते व त्याच्या पासून कुठलेही प्रदूषण होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोक याच मूर्तीच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत.या शाडू मातीच्या आकर्षक मूर्तींचे छायाचित्र प्रेस फोटोग्राफर
रविकिरण टाकळकर यांनी टिपले आहे.