spot_img
spot_img

नितेश राणें विरोधात शुक्रवारी ‘आक्रोश मोर्चा!’ -हिंदू मुस्लिम बांधवांनी मोर्चात सहभागी होऊन निषेध नोंदविण्याचे आवाहन..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुस्लिमांना मज्जिदीत जाऊन ‘चुन चुन के मारेंगे’ बोलणाऱ्या नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई करावी.या मागणीसाठी तसेच सदर वक्तव्याचा निषेध करण्यासाठी समस्त हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने 6 सप्टेंबरला निषेध आक्रोश मोर्चाचे आयोजन बुलढाण्यात करण्यात आले आहे.

या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन देत नितेश राणे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणे, धार्मिक दंगल घडवण्याचा प्रयास करणे यासह देशात आराजकता माजविण्याचा प्रयास केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावे. सदर मागण्यांची 48 तासात त्वरित पूर्तता करावी. अन्यथा बुलढाणा जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने नितेश राणेंच्या विरोधात सहा सप्टेंबरला बुलढाणा शहरातून प्रमुख मार्गाने निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तर हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी सामाजिक विकृती ठेचून काढण्यासाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील, सामाजिक कार्यकर्ते समीर खान, माजी नगसेवक मो सज्जाद, जनसेवक मोहम्मद सोफियान, एमआयएम शहराध्यक्ष दानिश अजहर, काँग्रेस नेते मोईन काजी, पत्रकार असलम शाह, माजी नगरसेवक बबलू कुरेशी, यासह सामाजिक कार्यकर्ते सय्यद जुनेद डोंगरे, विनोद गवई, सत्तार कुरेशी, सय्यद इकबाल, शेख अमीन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!