देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) देऊळगाव राजा बायपास मार्गावरील चौफुलांच्या क्रॉसिंग वरील दोन्हीही बाजूला शंभर कुठपर्यंत उंची कमी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाकडून जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
बायपासरील दुभाजकांच्या अतिरिक्त उंचीमुळे चौफुल्यांवर आडवी येणारी वाहने चालकाला दिसत नाहीत यामुळे या ठीकाणी नेहमीच अपघात होत आहेत, करीता सावखेड भोई चौफुली, सातेफळ चौफुली, शिवाजीनगर चौफुली, खोरेश्र्वर महादेव मंदीर चौफुली या चारही ठिकाणची दुभाजकांची उंची पुढील 15 दिवसांत कमी करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी मा. किरण कुरूंदकर यांना दिले व चर्चा केली.15 दिवसांत कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने परिसरातील नागरिकांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा इशारा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद घोंगेपाटील यांनी दिला. यावेळी कार्यध्यक्ष नरेशजी शेळके, महासचिव बी टी जाधव, बी एम जाधव, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.