बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जन सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उबाठा शिवसेनाची ‘मशालयात्रा’ आप मोताळ्यात पोहचली असून ही यात्रा बुलढाणा तालुक्यातील 151 गावामध्ये जाऊन नागरीकांच्या समस्या सोडविणार आहे.
शेतकरी, शेत मजूर, गोर गरीब, महिला असुरक्षितता, बेरोजगारी, महागई हे विषय घेऊन उबाठाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात मोताळा येथून मशाल यात्रेला सुरवात करण्यात आली.या मशाल यात्रे दरम्यान मोताळा व बुलढाणा तालुक्यातील 151 गावातील शेतकरी , शेतमजूर , गोरगरीब व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहे.त्यानंतर या मशाल यात्रेचा समारोप जिल्हाधिकारी कार्याल्यावर भव्य मोर्च्यात रूपांतर होणार आहे. यावेळी नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या सर्व समस्यबाबत एक निवेदन सरकारला जिल्हाधिकारी मार्फत देण्यात येणार आहे.