spot_img
spot_img

मनसेच्या उपजिल्हा रुग्णालयातील “श्रद्धांजली” आंदोलनाला यश!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/ करण झनके) गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात X-RAY टेक्निशियन व चांगली सुविधा मिळावी, या साठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून हार घालून श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले होते.दरम्यान या आंदोलनाला यश मिळाले असल्याने मनसेने वैद्यकीय अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गरजवंत रुग्णांना X-RAY टेक्निशियन उपलब्ध नसल्याने दिनांक 14 ऑगस्ट रोजी मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश उंबरकार यांना निवेदन देण्यात आले होते.परंतु तब्बल पंधरा दिवस उलटूनही निवेदनाची दखल न घेतल्याने संतप्त मनसे सैनिकांनी दिनांक 28 ऑगस्ट ला X-RAY मशीन ऑफिस ला हार फुल वाहून श्रद्धांजली अर्पण केली होती,या आंदोलनाची जिल्हा चिकित्सक डॉ.भूसारी तात्काळ दखल घेत मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात X-RAY टेक्निशियन इंगळे यांची नियुक्ती करून दिली असून मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील,मनवीसे तालुका अध्यक्ष गणेश जैस्वाल यांनी X-RAY टेक्निशियन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बुधवार रोजी दिव्यांग बोर्ड असतो त्यामुळे तपासणीसाठी दिव्यांग बांधवांना X-RAY टेक्निशियन उपलब्ध करून दिल्याने रुग्णांची X-RAY विभागात रांग लागलेली होती.यावेळी रुग्णांनी मनसे कार्यकर्ते यांचे आभार मानले,एकंदरीत मनसे ने केलेल्या “श्रद्धांजली” आंदोलनाने रुग्णांनची होणारी गैरसोय संपली असून आता बुधवार व शनिवारी X-RAY टेक्निशियन उपलब्ध होणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!