spot_img
spot_img

इम्पॅक्ट! जिल्हा रुग्णालयातील 23 कोटींचा भ्रष्टाचारी प्रकाश बोथे बडतर्फ होणार! -‘हॅलो बुलढाणा’ ची बातमी उमटली अन् आदेश धडकला! -फसव्या भंडारपाल बोथेची संपत्ती होईल सील; इतर दोषींच्याही उरात धडकी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज दुपारी ‘रुग्णसेवेच्या नावावर खाल्ला पोट फुटेपर्यंत मेवा’ ही जिल्हा रुग्णालयातील 23 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणीची बातमी ‘हॅलो बुलडाणा’ वर उमटली अन् जालनाच्या विभागीय चौकशी अधिकारी तथा निवृत्त पोलीस निरीक्षक प्रमुखांचा उपसंचालक अकोला यांच्याकडे आदेश धडकला.निलंबित भ्रष्टाचारी भांडारपाल प्रकाश नामदेव बोथेला आता बडतर्फ करण्याची शिफारस आदेशात असून त्याची पूर्ण संपत्ती जप्त होणार आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने यातील अनेक दोषींवरही कार्यवाहीची टांगती तलवार आहे.

महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील झालेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारापैकी एका विभागातील 23 कोटींचा भ्रष्टाचाराचा अहवालात उलगडा 99 कोटी रुपयांचा तारांकित प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशनात मांडला होता. दरम्यान ‘सिटीन्यूज’, ‘दैनिक जनसंचलन’ व ‘हॅलो बुलढाणा’तसेच तक्रारदार चंद्रकांत खरात यांनी याप्रकरणी रेटून पाठपुरावा केला होता व करीत आहे.आज या पाठपुराव्याचा इम्पॅक्ट दिसून आला.जालना येथील विभागीय चौकशी अधिकारी तथा निवृत्त पोलीस निरीक्षक प्रमुख यांनी अकोला उपसंचालकांना एक आदेश निर्गमित केला.या आदेशात म्हटले आहे की,एकंदर चौकशीतून निलंबित भंडारपाल प्रकाश बोथे हा सन 1997 मध्ये चालक म्हणून रुजू झाला व याने शासनाची फसवणूक करून
जानेवारी 2019 मध्ये चालक पदास अपात्रचे प्रमाणपत्र मिळवून कनिष्ठ लिपीक या पदावर वर्णी लावून बुलढाणा जिल्हा रुग्णालय येथे पात्रता व लिपीक पदाचा काहीही अनुभव नसतांना भांडारपालपदी वर्णी लावून घेतली. जानेवारी 2019 ते जानेवारी 2022 पर्यंत त्याने मनसोक्त भ्रष्टाचार/अपहार केला. व सदरची रक्कम स्वतःसाठी वापरून विनीयोग करून शासनाची फसवणुक केली. याबाबत पोलीसात दखलपात्र अपराध दाखल करून कार्यवाहीसाठी शिफारस करण्यात येत आहे.तसेच शिस्तीचे पालन केले नाही.

विभागीय चौकशीस हजर झाले नाही. म्हणुन एकतर्फी अहवाल सादर करीत आहोत. व या करीता प्रकाश नामदेव बोथे यांना खात्यातुन विनाविलंब कायमस्वरूपी बडतर्फ करण्याकरीता शिफारस करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.दरम्यान भ्रष्टाचार झाला तेव्हाचे तत्कालीन डॉ प्रेमचंद पंडित, डॉ नितीन तडस, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक व इतर विभागातील अधिकारी,कंत्राटदार यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून,चौकशी सुरू असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

क्रमशः

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!