सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्ह्यातील गारुडी म्हणून प्रसिद्ध असलेले रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्यासाठी, आपल्या विविध मागण्यांसाठी, मा जिजाऊ जन्मस्थान राजवाड्यासमोर जे आमरण उपोषण सुरू केलेले आहे, उपोषणाच्या पहिल्या दिवशी कुमारी गायत्री गणेश शिंगणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्या या आंदोलनाला, आमरण उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकऱ्याप्रती असंवेदनशील असलेल्या सरकारला धडा शिकवण्यासाठी, रविकांत तुपकर यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेतृत्व पुढे येत असेल, तर शेतकरी हितासाठी आम्ही कायम त्यांच्या सोबत राहु, असेही गायत्री शिंगणे म्हणाल्या.
या प्रसंगी त्यांचेसोबत,राष्ट्रवादी श. प. गटातिल तालुकाप्रमुख श्री राजेंद्र अंभोरे, आरिफ खान पठाण, अमोल भट, संतोष पाटील,रवींद्र इंगळे, नितीन कायंदे, अरुण मोगल, अशोक मोगल, अभय मोगल, योगेश शेरे, सिद्धेश्वर सोळंके, विशाल पाटील व धनंजय जोशी इत्यादी मंडळी हजर होती.