बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.शेकडो हेक्टर वरील शेती पिके उध्वस्त झाली असून,झालेल्या पिक नुकसानाची सरकारने शंभर टक्के भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी रेटली आहे. तूपकरांचे आज सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू होत आहे.त्यापूर्वी त्यांनी आज पिक नुकसानीची पाहणी केली.
गेल्या 4 दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने शेतीपिकांचे, शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच पैनगंगा नदीला आलेल्या पुराने अनेक ठिकाणी शेतजमिमी खरडून गेल्या आहे. या झालेल्या नुकसानीची शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पाहणी केली. चिखली तालुक्यातील पेठ, उत्रादा, सोमठाणा, दिवठाणा परिसरात तुपकरांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची सरकारने तातडीने १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तुपकरांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचे आज पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू होत आहे. आंदोलनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही पाहणी केली. त्यानंतर ते सिंदखेडराजा कडे अन्नत्याग आंदोलनासाठी रवाना झाले आहेत.