सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) पिक विम्याच्या प्रश्नासंबंधी काही दिवसापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट पक्षाने काढलेल्या भव्य मोर्चाच्या दडपणाने जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या केबिनमध्ये बसून आणि झूम मीटिंगवर चर्चा करून 31 आगस्टपुर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे रक्कम पडेल असे आश्वासन दिले होते.
आता सप्टेंबर महिना सुरू झाला तरी पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पडली नाही, अशातच पुन्हा पंधरा दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा पडेल असे आश्वासन देण्यात आले आहे, पुन्हा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी माध्यमासमोर फोनवर बोलण्याचा व त्याची बातमी होईल याची व्यवस्था करण्याचा तोच तमाशा करण्यात आला आहे.
त्यामुळे पिक विम्याची भेटणारे आश्वासन हे लबाडा घरचे आवतन असून जेवल्या खेरीज त्याचे काही खरे नाही,अशी टिका कु. गायत्री शिंगणे यांनी केली आहे.