लोणार (हॅलो बुलढाणा /यासीन शेख) विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा वाशिम- जालना रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे राजेश मापारी यांनी मागणी रेटली आहे.
विदर्भातील बुलडाणा जिल्हा रेल्वेच्या बाबतीत मागासलेला असल्याने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात एकच रेल्वे मार्ग सुरू आहे रेल्वे सुविधा भारतातील जलद वाहतुकीला चालना देण्यासाठी,भारत सरकारच्या रेल्वे विभागाकडून दररोज नवीन प्रकल्प सुरू केले जात आहेत, ज्यामुळे देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होत आहे. विदर्भातील वाशीम जिल्हा मराठवाड्यातील जालना जिल्ह्याला रेल्वेमार्गाने जोडला गेला, तर स्वातंत्र्यानंतर प्रथमच या भागात रेल्वेचा विस्तार होईल. या रेल्वे मार्गाचा फायदा तेथील नागरिकांना होणार असून, या रेल्वे मार्गामुळे विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात असलेले महाराष्ट्राचे अभिमानाचे प्रतीक असलेल्या स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांचा परिसरही जोडला जाणार आहे. राजमाता यांचे जन्म गाव सिंदखेडराजा तसेच देशाची शान आणि अ वर्ग दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले देशातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि वाशिम येथील बालाजी मंदिर हे देखील या मार्गाने जोडले जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. या रेल्वे मार्गाद्वारे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या रेल्वे मार्गाने मराठवाड्यातील नागरिकांना विदर्भात जाणे आणि विदर्भात राहणाऱ्या नागरिकांना मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणे सोपे होणार आहे. रेल्वेच्या विस्तारासाठी केलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो.देशातील सर्व महत्त्वाची ठिकाणे रेल्वेने जोडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करण्यात येत आहे.
जालना ते वाशिम हे अंतर फक्त 160 किमी आहे आणि त्यामध्ये भरपूर ई वर्ग जमीन उपलब्ध आहे, त्यामुळे या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी कमीत कमी पैसा खर्च होणार आहे. या भागातील मागासलेला भाग दूर होऊन या भागातील लाखो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात
मागणीचा गांभीर्याने विचार करून या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी द्यावी, आपल्या सकारात्मक दृष्टीमुळे या भागाचा व या भागात काम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा विकास होईल असे निवेदन राजेश श्रीराम मापारी तालुकाध्यक्ष लोणार तालुका काँग्रेस कमेटी यांनी केंद्रीय रेल मंत्री
अधिनजी वैष्णव यांच्याकडे केली आहे.