बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा बुलढाणा शहर पदाधिकार्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
या नवनियुक्तीं मध्ये ज्ञानेश्वर गायकवाड यांची शहर उपाध्यक्षपदी, अंकित ठाकूर यांची शहर सचिव पदी, दर्शन गवळी यांची शहर सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.येणाऱ्या काळात पक्षासाठी व देशासाठी काम करण्याची इच्छा यांनी व्यक्त केली.
सदर नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश जी मांटे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विनायकभाग्यवंत ,डॉक्टर सेलचे राजेश्वर उबरहंडे सर , शहर संयोजक अरविंद होंडे, तालुका किसान प्रमुख मंदार बाहेकर व भाजयुमो संघटन मंत्री जिल्हा वैभव लाड यांच्या उपस्थितीत तर भाजयुमो शहर अध्यक्ष प्रतीक गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.