बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी पदभार स्वीकारला असून ते शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सरसावल्याचे दिसून येत आहे.वाहतूक विभाग रस्त्यावर उतरला असून,वाहनधारकांना शिस्तीचे धडे देत आहे. वाहनधारकांनी जर नियम मोडले तर दंडात्मक कारवाईचा दंडुका उगारला जाणार आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहनांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्याचे पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे.शहरात सिग्नल व्यवस्था कोलमडल्याने वाहतुकीची कोंडी होत असून सिग्नल नसल्याने वाहनधारक सुसाट वाहने दमटवीत होते. कुठल्याही नियमाचे पालन न करता कसेही वाहन चालवीत होते.दरम्यान
वाहतूक विभागा मार्फत स्टेट बँक चौकात चारी बाजूचे वाहन काही क्षणासाठी थांबून प्रत्येक एक भाग सोडणे तर दुसरा रोखणे तर तिसरा सोडणे चौथा थांबविणे असे करण्यात आले.मुंबई,पुणे सारख्या मोठ्या शहरात जे सिग्नल वर वाहन थांबविल्या जातात तशाच प्रकारे बुलढाणा शहरात आज वाहनं थांबविण्यात आले. ज्या वाहनावर नंबर प्लेट नाही किंवा फॅन्सी नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट जाताना आणि वाहन चालवीत असताना मोबाईलवर बोलणे अशा वाहनधारकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे आता पोलिसांच्या दंडात्मक कारवाई पासून वाचायचे असेल तर वाहतूक नियमांचे शिस्तीने पालन करावे लागणार आहे.