बुलढाणा (हॅलो बुलढाणा)आगामी विधानसभा निवडणूक इच्छुकांची उबाठा शिवसेनेकडे धाव दिसून येत आहे.आज बुलढाणा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमित सरदार व मेहकर मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे सिद्धार्थ खरात यांनी थेट मातोश्रीकार्यालय गाठून शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे बुलढाणा शहरातील सुमित सरदार आणि मेहकर मतदार संघाचे नेतृत्व करू इच्छिणारे प्रशासकीय सेवेतील सिद्धार्थ खरात यांनी आज मुंबई गाठली.
शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत व नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतले आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेची तिकीट मिळविण्यासाठी ची धडपड सुरू असून यापूर्वी बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके यांनी सुद्धा शिवबंधन बांधले आहे.शिवसेनेकडून अनेक जण तिकिटासाठी इच्छुक असून,कुणाची लॉटरी लागेल? हे येणारी वेळच सांगणार आहे.