देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) संततधार बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहू लागले असून खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पाचे 19 द्वार हे 0.50 मीटरने सुरु असून एकूण 1293.18 cumec विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यासह विदर्भात पाऊस सुरू आहे.बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प दुथडी भरून वाहत आहेत.पाण्याचा प्रवाह इतका जोरदार आहे की,अनेक ठिकाणी अनेक गावांचा संपर्क तुटल्याची बातमी समोर येत आहे.देऊळगाव मही येथील सर्वात मोठा खडकपूर्णा प्रकल्प तुडुंब भरला आहे.आज या प्रकल्पाची 19 दरवाजे उघडण्यात आले.या प्रकल्पाची पाणीपातळी 520.250 मी. असून प्रकल्पात जीवंत साठा 86.4220 द.ल.घ.मी.इतका आहे.त्याची टक्केवारी 92.23 इतकी आहे.
3 सप्टेंबर रोजी सकाळी11.00 वाजता प्रकल्पाचे 19 द्वार हे 0.50 सुरु असून एकूण 1293.18 cumec विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असली तरी, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे,असे आवाहन खड़कपूर्णा प्रकल्प,पूर नियंत्रण कक्षाने केली आहे.