बुलढाणा(हॅलो बुलढाणा) सुंदरखेड येथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे.
काँग्रेस नगरातील एका नागरिकाच्या पीठ गिरणीत पावसाचे पाणी शिरत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे.सरपंचांनी ही समस्या निकाली काढावी अशी त्यांची मागणी आहे.
सुंदरखेड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या काँग्रेस नगर येथे हनुमान मंदिरासमोर दीपक साखरे यांचे घर आणि पीठ गिरणी आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यावरील पावसाचे पाणी त्यांचे पीठ गिरणीमध्ये शिरकाव करते. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या संदर्भात त्यांनी अनेक वेळा सरपंचांना ही समस्या सोडवण्याची मागणी केली.परंतु सरपंच चव्हाण काम करून देतो म्हणून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होतोय. राजकारणी केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेत असतात.याचा प्रत्यय साखरे यांना येत असून सदर प्रश्न मार्गी काढावा अशी दीपक साखरे यांनी मागणी केली आहे.










