4.1 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

spot_img
spot_img

IndiGo Receives Bomb Threat: चेन्नई-मुंबई इंडिगो प्लाइटला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, विमानतळावर इमर्जन्सी घोषित

IndiGo Receives Bomb Threat: चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या प्लाइटला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, 6E-5314 प्लाइटच्या क्रू ला टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्यात प्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचे लिहिले होते.

यानंतर सव्वा नऊच्या सुमारास मुंबई विमानतळावर प्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. लँडिंगनंतर प्लाइटची तपासणी करण्यात येत आहे. मुंबई विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. आठवड्याभरात प्लाइटला बॉम्बची धमकी देण्याची ही दुसरी वेळ आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये एक पायलट सामानासह आपत्कालीन स्लाइडमधून विमानातून बाहेर पडताना दिसत आहे.

यापूर्वी, दिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. येथेही टॉयलेटमध्येच टिश्यू पेपरवर प्लाइटलमध्ये बॉम्ब असल्याचे लिहिण्यात आले आले होते. तसेच, काल (31 मे रोजी) दिल्लीहून येणाऱ्या विस्तारा फ्लाइट UK611 ला बॉम्बची धमकी मिळाल्याने श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ उडाला होता. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) श्रीनगरला धमकीचा फोन आला होता.

28 मे रोजी इंडिगोचे विमान उडवून देण्याची धमकीही मिळाली होती

याआधी, 28 मे रोजी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या प्लाइटलाही बॉम्बची धमकी मिळाली होती. फ्लाइट 6E2211 मधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले होते. एअरलाइनने सांगितले होते की, सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केले गेले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!