spot_img
spot_img

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.. लोकसभेत अडीच लाख मत मिळविणाऱ्या रविकांत तुपकर यांनी कर्तृत्व सिद्ध केलंय! -शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष व वेळप्रसंगी त्यागवृत्तीचे फलित ! -उद्या पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांसाठी धडपडणारे आणि वेळप्रसंगी कसलाही त्याग करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत तब्बल अडीच लाख मते मिळविण्याची किमया साधली आणि आपले कर्तुत्व सिद्ध केले,असे गौरवोद्गार माजी मंत्री काँग्रेस नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.नुकत्याच पार पडलेल्या एका पत्रकार संघटनेच्या अधिवेशनात त्यांनी रविकांत तुपकर यांच्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या संघर्ष आणि त्यागवृत्तीला अधोरेखित केले.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाला मेहनती शेतकरी कार्यकर्ता, शेतकऱ्यांसाठी धडपडणारा व वेळप्रसंगी कसलाही त्याग करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे.त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली.या निवडणुकीत अडीच लाख मत मिळवून. आपले कर्तृत्व सिद्ध केले.विधानसभा निवडणुकीला अपक्ष उभ राहणे आणि निवडून येणे हे होऊ शकते.परंतु लोकसभेला मोठे संघटन असल्यानंतरच अडीच लाख मते मिळू शकतात. किंवा लोकांमध्ये उमेदवाराबद्दल जिव्हाळा असला तर ही किमया होऊ शकते.परंतु रविकांत तुपकर यांच्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या संघर्ष आणि त्यागवृत्तीने त्यांना लोकसभेत अडीच लाख मत मिळाली हे त्यांचे कर्तुत्व आहे,असेही माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

▪️सरकारने ठोस निर्णय घेतल्यास उद्या तूपकरांचा बेमुदत अन्नत्याग! 

रविकांत तुपकरांचा आत्मविश्वास दुणावला असून ते आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहेत.बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील हे निश्चित नसले तरी, त्यांची जोरदार तयारी सुरू आहे.तूपकर यांनी शेतकरी प्रश्नांवर सरकारला आज 3 सप्टेंबर पर्यंतची मुदत देऊन उद्या 4 सप्टेंबरला आंदोलनाचे शस्त्र उगारणार असल्याचा इशारा दिला आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ,पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने 3 सप्टेंबर पर्यंत ठोस निर्णय घेतले नाही, तर 4 सप्टेंबर पासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर हजारो शेतकऱ्यांसह बेमुदत अन्नत्याग आंदोलना सुरुवात करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!