बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिल्ली येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या घुमंतू व विमुक्त जन जाती विशेष पथक यांच्या वतीने पक्ष कार्यालयात मुक्ती दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात संजय राठोड चांगलेच रममान झालेले दिसून आले.
याप्रसंगी खा मुकुल वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा येथील बंजारा समाजातील महिला व नेते मंडळींनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांची घेतली भेट. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अँड.संजय राठोड, श्री.राजेश राठोड, श्री.आकाश जाधव,श्री.अविनाश चव्हाण, श्री विठ्ठल चव्हाण, श्री.एकनाथ चव्हाण,श्री.साहेबराव चव्हाण, श्री.राजाराम पवार,श्री.उमेश चव्हाण,श्री. तुकडू जाधव, श्री.काशीराम पवार,तसेच बहुसंख्य बंजारा समाजातील महिला व नेते मंडळी व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.