रायपूर (हॅलो बुलढाणा/ सचिन जयस्वाल) कृषीप्रधान ग्रामीण संस्कृतीत बैलांचे पुजन करणारा पोळा हा खास सण रायपुरात पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला.
पोळ्यात शिव व शंभू देशमुख यांच्या मानाची बैल जोडी आकर्षण ठरली. बैलांचा साजशृंगार करीत त्याला गोडधोड खाऊ घालून मिरवणूकीत फिरवण्याचा हा पोळा सण उत्साहात साजरा झाला पण हजारोंच्या संख्येत असणारा बैलांचा पोळा आता शेकड्यावर आल्याचे दिसून आले.याप्रसंगी सरपंच पती ग्रामपंचायत सदस्य सुनील देशमाने,
बालाप्रसाद जयस्वाल व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.