spot_img
spot_img

‘कुणी नाही पावरफुल..10 दिवसांपासून बत्ती गुल!’ -सणासुधीच्या काळात महावितरण म्हणते ‘मेरी मर्जी!’

जानेफळ (हॅलो बुलढाणा / गणेश ताकतोडे) उत्सवाच्या काळात महावितरण ची मनमानी सुरू असून,मोहना खुर्द येथे गत 8 ते 10 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.रात्रीही वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागते.ही वीज समस्या दुर्लक्षित असून, कुणी पावरबाज दिसून येत नाही.ही वीज दुरुस्ती कोण करणार? हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

महावितरणच्या जानेफळ उपविभागांतर्गत येत असलेल्या मोहना खुर्द येथे गत आठ दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे.गावात वायरमन नसल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्यास पूर्ववत होण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे, रोहीत्रात बिघाड झाल्यास खासगी वायरमनकडून दुरुस्त करावी लागत आहे. जनतेला गिरणीसाठी दुसऱ्या गावी जावे लागत आहे. परिणामी वीज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जानेफळ येथील अभियंता यांच्याशी संपर्क केला असता वीज पुरवठा लवकरच सुरळीत करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते तरीही कर्मचारी त्यांच्या आदेशाचे पालन होत नाही व वायरमन ला काॅल केला असता 5 नंतर माझी डिव्हटी नाही असे उत्तर दिले जाते यांना मुजोर कर्मचारी म्हणावं लागेल,अशा संतप्त भावना व्यक्त होत असून वीस दुरुस्तीची मागणी जनतेकडून केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!