spot_img
spot_img

रविकांत तूपकरांची सहकुटुंब बैलांप्रति कृतज्ञता! -सावळ्यात शेतकऱ्यांनी जपल्यात बैलजोड्या!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या मूळ सावळा या गावी गावकऱ्यां समवेत शेतकऱ्यांचा खरा सवंगडी असलेल्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करून पोळा साजरा केला.

शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. हा सण सर्जा-राजाला समर्पित असून, या सणानिमित्त गावागावांत सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते.कृषी कार्यात हजारो वर्षांपासून जनावरांचा उपयोग फार महत्त्वाच्या ठरलेला आहे. वर्षभर बैलांकडून आपल्या शेतीची कामे करीत असताना वर्षातून एकदा श्रावण महिन्याच्या अमावास्येला येणाऱ्या पोळ्याच्या सणाला एक दिवस बैलांसाठी समर्पित केला जातो.आज जरी बैलांची संख्या कमी होत असली तरी तुपकरांच्या सावळा गावी मात्र शेतकऱ्यांनी बैलजोड्या जपल्या आहेत. हे विशेष म्हणावे लागेल.आज पोळ्यानिमित्त बैलांना सजवून तुपकरांनी त्यांचे पूजन केले. भर पावसात सावळा गावी पोळा साजरा करण्यात आला. दरवर्षी रविकांत तुपकर हे त्यांच्या मूळ गावी पोळा साजरा करतात, गावकऱ्यांना भेटतात त्यांची आस्थेने चौकशी करतात, यावर्षीही त्यांनी आपल्या सावळा गावी पोळा साजरा करून शेतकऱ्यांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या व बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!