spot_img
spot_img

‘खेळ’ मांडला..! -तब्बल १२ वर्षांपासून चाललाय क्रीडा संकुलाचा खेळ!

लोणार (हॅलो बुलढाणा/यासीन शेख) राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे यासाठी शासन प्रत्येक तालुका स्तराला क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते. परंतु लोणार तालुक्यातील क्रीडा संकुलाचे काम १२ वर्षांपासून सुरू असून अद्यापही पूर्ण झाले नसल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे.या क्रीडा संकुला बाबत १ सप्टेंबरला लोणार येथील खेळाडू व ‘मी लोणारकर’ टीम च्या वतीने आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना निवेदन देण्यात आले.

सध्या लोणार येथील खेळाडूंना खेळण्यासाठी कुठे ही जागा शिल्लक नाही तसेच लोणार तालुक्यातील विद्यार्थी व खेळाडू क्रीडा संकुल व क्रीडा सुविधे पासून वंचित आहेत. लोणार येथील क्रीडा संकुलाचे काम मागील दहा ते बारा वर्षापासून सुरू आहे.झालेल्या कामांची सुद्धा पडझड होत आहे.
पुरोगामी व आधुनिक महाराष्ट्रासाठी ही बाब निश्चितच भूषणावह नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान क्रीडा संकुलचे लवकरच काम पूर्ण करू व सदर संकुल हे खेळाडूंना उपलब्ध करून देऊ असे आश्वासन या वेळी आमदार रायमुलकर यांनी दिले आहे. यावेळी लोणार तालुक्यातील खेळाडू शाम आत्माराम कुटे, गणेश भास्कर उंबरकर, विजय मुंढे, कमलेश विनोद आगरकर, संदीप भोसले आणि ‘मी लोणारकर’ टीम सदस्य सचिन रामदास कापुरे इ. उपस्थीत होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!