बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘भिता कशाला? थेट भिडा!’असा सल्ला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे यांनी नुकत्याच झालेल्या रोजगार मेळाव्यात दिल्याने काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळांनी ‘झूकेगा नही साला!’ अशी भूमिका घेऊन सोशल वॉर सुरु केलाय तो विद्यमान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध!
तत्पूर्वी झालेल्या काँग्रेसच्या रोजगार महोत्सवात काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे यांनी म्हटले की, भिता कशाला, ? थेट भिडा! मोदींवर काय बोलता? स्थानिक आमदारांवर बोला..त्यांची वाढलेली गुंडागर्दी,त्यांनी कमावलेला पैसा चव्हाट्यावर आणा..असा सल्ला गावंडे यांनी दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ कामाला लागलेत. त्यांनी प्रथम फेसबुक वर आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस धूतानाचा व्हिडिओ व्हायरल करून ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ अशी पोस्ट व्हायरल केली.त्यानंतर गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाला अड्डा संबोधून शब्द मागे घेतला. यानंतर गायकवाड समर्थकांनी देखील फेसबुक पोस्ट वरून हर्षवर्धन सपकाळ यांचा मुंबईतील 100 करोड रुपयांचा बंगला आला कुठून?असा प्रश्न विचारात भल्या माणसाच्या भ्रष्टाचाराचा दावा करून सपकाळ यांचा निषेध केला.हे वाकयुद्ध अजून थांबले नाही.हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा ‘ झुकेगा नाही साला’ म्हणत ‘असेल हिम्मत मोजा किंमत’ अशी पोस्ट टाकली. यामध्ये म्हटले आहे की, गत पाच वर्षांत बुलढाणा विधानसभा क्षेत्रात जबाबदार विरोधीपक्ष म्हणून मी तात्विक विरोधक म्हणून भूमिका स्वाभाविकपणे स्विकारली आहे. जिथे विचारांना, मनाला खटकले, चूक वाटले तिथे बोलणे कर्तव्य आहे. चूप बसणे, बोटचेपी भूमिका घेणे,खोडसाळपणा,घाबरणे, मांडवली करणे इत्यादी माझ्या वृत्तीत नाहीच, आणि जिवंत असेपर्यंत कदापिही असणारही नाही. गतकाळात बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील विकास कामांच्याअनुषंगाने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी घेतलेली भूमिका व अनुषंगिक फायबरचे पुतळे , अवैध व्यवसाय, गुंडागर्दी बोकाळलेला भ्रष्टाचार आदी मुद्दे जनतेसमोर आणले. करीता विद्यमानांची चांगलीच पंचायत झाल्याचे दिसते. सोबतच विविध ठिकाणी माझ्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून मी “संवाद मेळावे’ घेत असतांना, मोठ्या संख्येने व उत्साहाने मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे घाबरगुंडी उडणे ही स्वाभाविकच. मी त्यांची चिडचिड व भीती समजू शकतो. तेव्हा त्यांनी थेट आपले म्हणने मांडावे,नाहक भ्रम निर्माण करण्यासाठी खर्चिक जाहिरातबाजीच्या माध्यमातून खोटे-पण रेटून नेत आहेत.लाभार्थ्यांचे खांदे वापरून किंवा त्यांच्या कडून खालच्या भाषेत ट्रोलिंग करून निराधार आरोप करू नयेत. खुलेआम न घाबरता सामोरे यावे, ही अपेक्षा वजा विनंती.असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.शिवाय #तूर्तास = विषय माझ्या नरिमन पॉइंट,मुंबई येथील शंभर कोटीच्या फ्लॅट बाबत आपणास खुले चॅलेंज आहे की, तीन दिवसात माझ्या तथाकथित फ्लॅटचा पत्ता शासकीय दस्तावेज सार्वजनिक करावेत. तसे असल्यास मी राजकीय जीवनातून निवृत्ती घेतो, एव्हढे नव्हे तर वरून फ्लॅटच्या चाब्या व फ्लॅटची मालकी तुमच्या नावे करुन देतो. ,#अन्यथा तीन दिवसानंतर तुम्ही वाघजाळ फाट्यालगत आमदार निधीतून झालेला कॉक्रीट रस्ता असलेली टुमदार बंगला व शेत जमीन (जी आपण एका महिले कडून बळकावलेली आहे ) हायकोर्टाने आपल्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश सुद्धा दिलेला आहे ,ती संपूर्ण जमीन मूळ मालक असलेल्या लाडक्या बहिणीला परत करावी. नरिमन पॉईंटचा माझा फ्लॅट आपण सांगाल त्याला दान देऊ, बक्षीस देऊ, खरेदी करून देऊ ,एखाद्या तीर्थक्षेत्राला देवू ,प्रसंगी बुलढाणा शहरातील फायबर प्लास्टिकच्या पुतळ्यांऐवजी ब्रांझ धातूचे करण्यासाठी आपणच तो पैसा खर्च करा ! अगदी काहीही करा कागदपत्र दाखवा तो फ्लॅट तुमचा. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठलाही संबंध असला तरीही चालेल. शाहू महाराजांच्या वेशातपहिले,तेव्हा- वाघाचा दात ‘खरा” असल्याचे सांगितले , मात्र नंतर तो निघाला “प्लास्टिकचा” , असे माझे होणार नाही, याची खात्री देतो. आणि हो , शपथेवर सांगतो की , मी माझ्या शब्दावरून अजिबात फिरणार नाही.
भला आहे की नाही माहित नाही, मात्र प्रामाणिक निश्चित आहे.
ता.क. – यापुढे मला गप्प बसविण्या साठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप-प्रत्यारोप केल्या जातील. अत्यंत गलिच्छ व खालच्या भाषेत शिवीगाळ केल्या जाईल. मी काहीच विकास कामे केलेले नाहीत, असे धादांत खोटे वारंवार बोलल्या जाईल , मात्र मी विचलित होणार नाही.’झुकेगा नही साला’ असेही पोस्टच्या शेवटी हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले आहे.