चिखली (हॅलो बुलडाणा) विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ श्वेताताई महाले यांना देशाच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2023 -24 करिता महाराष्ट्र विधानसभा “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार जाहीर झाला आहे.
परंतु काही अतिउत्साही पत्रकारांनी त्यांना “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कार जाहीर झाल्याचे,एवढे प्रसारित केले की,स्वतः आमदार श्वेताताई महाले यादेखील कन्फ्युज झाल्या असतील,अय बाबांनो…. श्वेताताई महाले विधानसभा आमदार आहेत,संसदपटू नव्हे!!
आमदार असलेल्या श्वेताताई महाले या महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा या गृहाच्या सदस्य आहेत.त्या आमदार आहेत. संसदेमध्ये माननीय राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो.श्वेताताई महाले या लोकसभा व राज्यसभेच्या सदस्या नसल्यामुळे त्या “संसदपटू “होऊ शकत नाही.
आमदार असलेल्या श्वेताताई महाले यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे त्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदनच!!!
परंतु विधानसभेमध्ये त्यांनी जे भाषण केले असेल त्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या लोकांच्या, आपल्या विधानसभा मतदारसंघांच्या समस्या व विकास यासंबंधी नक्कीच उहापोह केलेला असेल,तर असे हे सर्वांग सुंदर भाषण त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील जनतेलाही पाहण्यासाठी त्यांनी प्रसारित करायला हवं.
आमदार श्वेताताई महाले यांचे पहिले भाषण जे ” डी फॉर देवेंद्र आणी डी फॉर डेव्हलोपमेंट…पुढचा डी???….आठवेना,यामुळे प्रसिद्ध झाले होते त्या स्तरावरून उत्कृष्ट भाषण पटूचा पुरस्कार मिळेपर्यंत त्यांची झालेली प्रगती नक्कीच प्रशंसनीय आहे,फक्त आमच्या माहितीसाठी व विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या ज्ञानासाठी त्यांनी आपले उत्कृष्ट भाषण प्रसारित करायला हवे अशी आम्ही मागणी करतो.असेही उदयनगरचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,चिखली मनोज लाहुडकर म्हणाले.