बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती..आनंद व्यक्त करणं.. श्रमानंतर थकवा घालविणे..असाच थकवा घालवत विरंगुळा म्हणून बंजारा समाज भगिनींनी मुकुल वासनिकांच्या घरी पारंपारिक नृत्याचा आनंद घेतलाय! सोबतच खा.मुकुल वासनिक आणि काँग्रेस नेते संजय राठोड यांनीही ठेका धरला!
बुलढाण्यात काँग्रेसचे नेते ॲड. संजय राठोड यांनी रोजगार महोत्सव 30 ऑगस्ट ला आयोजित केला होता.रोजगार महोत्सवात 1860 जणांचे ऑन द स्पॉट सिलेक्शन करण्यात येऊन बेरोजगार तरुणांना मल्टी नॅशनल कंपन्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले.दरम्यान काँग्रेसचे खासदार मुकुल वासनीक यांनी राठोड यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.त्यानंतर बंजारा समाज बांधव,भगिनींनी व पदाधिकारी यांनी खासदार मुकुल वासनीक यांचे दिल्ली येथील घर गाठले. यशस्वी रोजगार महोत्सवातील थकवा घालविण्यासाठी पारंपारिक बंजारा नृत्य सादर करून आनंदमयी जल्लोष केला.यावेळी खासदार वासनिक यांच्या कुटुंबियासह संजय राठोड यांनी देखील नृत्यावर ठेका धरला.