spot_img
spot_img

डॉ नीता वाघ म्हणाल्या.. लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला चौरंग’ शिक्षा द्या ! -चिमुकल्यांसाठीआत्मविश्वास,मनोबल,सबलीकरणाचे दिले धडे!

देऊळगाव (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव)
बदलापूर इथल्या एका शाळेतील शिशु वर्गातील चार वर्षांच्या चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने राज्यात संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढविण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन मिळावे या साठी स्वामी विवेकानंद विद्यालय देउळगावमही येथे शालेय महीला विद्यार्थीनी सुरक्षा मार्गदर्शन शिबिर शनिवार रोजी आयोजित करण्यात आले होते. शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देउळगाव मही नगरीचे सरपंच कमल शिंगणे, प्रमुख अतिथी डॉ. नीता नितीन वाघ, मुख्याध्यापक श्रीधर जायभाये उपस्थित होते. या वेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ नीता वाघ यांनी शालेय विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच बद्दल मार्गदर्शन केले तसेच वाढत्या वयात विद्यार्थिनींमध्ये होणारे बदल तसेच सामाजिक कृतीबद्दल शालेय विद्यार्थिनींनी संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये कठोर कायदे असून सुद्धा अशा समाजातील विकृती या समाजामध्ये निर्धास्त पणे फिरत आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चौरंग शिक्षा अमलात आणून अशा दोषींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून यानंतर अत्याचार करण्याचे धाडस होणार नाही, असे मत वाघ यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच कमल शिंगणे यांनी शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन व आभार रोहिणी आकाश पेटकर यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!