बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘पोलीस गाडी धुण्याचे प्रकरण’ थांबायचं नाव घेत नाही. विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्यावर फेसबुक व प्रत्यक्ष मीडियासमोर प्रतिक्रिया देऊन टीकाटिपणी करणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर आता आ. गायकवाड समर्थकांनी फेसबुक वरून टिकेची झोड उठवली आहे.’मुंबई नरिमन पॉईंट येथे शंभर करोडचा आलिशान फोर बीएचके फ्लॅट..?बुलढाण्याच्या एका भल्या माणसाकडे इतका पैसा आला कुठून?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. इतरही कॉमेंट्स फेसबुक वर उमटले असून, त्या चवीने वाचल्या जात आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे आम. संजय गायकवाड यांची गाडी पोलीस धूत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे माजी हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक वरून व्हायरल केला होता.’कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विचारला होता.त्यानंतर पुन्हा मीडिया समोर त्यांनी याच संदर्भात प्रतिक्रिया दिली. हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाड यांच्या कार्यालयाला अड्डा म्हणून शब्द मागे घेतला.दरम्यान सदर प्रकरणाची शहानिशा व्हावी अशी प्रशासनाला विनंती केली.
कार्यालयात आणि परिसरात सीसीटीव्ही आहेत.पोलिसाने उलटी केली असेल तर ती सीसीटीव्ही मधून पुढे येईल,असे सपकाळ यांनी म्हटले.दरम्यान आ. संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी देखील फेसबुक वॉर सुरू केला आहे. ‘मुंबई नरिमन पॉईंट येथे शंभर करोडचा आलिशान फोर बीएचके फ्लॅट बुलढाण्याच्या एका भल्या माणसाचा! इतका पैसा आला कुठून? जनतेला लुबाडणारा..’ अशी खोचक पोस्ट टाकण्यात आली आहे. त्याखाली आलेल्या कॉमेंट्स देखील आम्ही जशीच्या तशी देत आहोत..’या बंटी सपकाळ ला म्हणावं मातृभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून एड्स मध्ये किती निराधार महिलांची नावे टाकलेली आहे.ते सांगण्याची वेळ आली आहे.बंट्या तू तो गया’ अशा कमेंट्स बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील लोक चवीने वाचत आहेत.