spot_img
spot_img

गवसणी ! “सावित्रीच्या लेकीच्या यशाने शिक्षक पित्याला आभाळ ठेंगणे!” -सृष्टी जाधवची नागपूर एम्समध्ये निवड

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक काँग्रेस नगरमधील सृष्टी विलास जाधव हिची पहिल्याच प्रयत्नात देशातील नामांकित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरमध्ये एमबीबीएस साठी निवड झाली आहे. मुलीच्या यशाने शिक्षक पित्याला आभाळ ठेंगणे झाले.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. सृष्टीच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते. लहानपणापासून तिने शिक्षणात चुणूक दाखवली. तिचे दहावीपर्यंत शिक्षण सिबीएससी बोर्ड अंतर्गत बुलढाणा येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे. दहावीत तिला ९४ टक्के गुण मिळाले. तर बारावीत ९३ टक्के गुण मिळाले आहेत. नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तिची नागपूर येथील एआयआयएमएस संस्थेत एमबीबीएससाठी निवड झाली. सृष्टीचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. वडील विलास जाधव हे मूळचे चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील आहेत. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. बारावीत चांगले गुण मिळवून डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्याकरिता त्यांनी कठोर परिश्रम घेतले होते. परंतु त्यांना मेडिकलसाठी प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर त्यांनी डीएड करुन शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न मुलीने पूर्ण केले असे म्हटल्यास वावगे ठरु नये. सृष्टीने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक काळपांडे, आजोबा, आजी, शिक्षकवृंद, आई-वडिलांना दिले. यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!