बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये भरघोस अशी १५० च्यावर बुद्धविहार बांधकाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच प्रत्येक विहारासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे.त्या प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये गायकवाड यांच्यातर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती भेट म्हणून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मूर्तीसाठी बुद्धविहारांना रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.
आज ३१ ऑगस्ट रोजी बुलढाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे आमदार संजय गायकवाड यांच्यावतीने मतदार संघातील सर्व बुद्धविहाराच्या स्मारक समितीचे सर्व सन्माननीय सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गायकवाड यांनी बुद्धविहार स्मारक समितीच्या अध्यक्ष व सचिवांना तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीसाठी रोख रक्कम सुपूर्द केली.दरम्यान आमदार संजय गायकवाड यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला.यावेळी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच मतदारसंघातील बुद्ध विहार स्मारक समितीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष,सचिव, सदस्य तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक बुद्ध विहारांना मूर्तीसाठी किती रक्कम देण्यात आली याची माहिती मिळू शकली नाही.