spot_img
spot_img

‘कुणी टावर वर चढले तर कोणी पिंपळाच्या झाडावर!’ -कश्यासाठी आणि कुठे झाले हे जीवघेणे आंदोलन?

मलकापूर (हॅलो बुलढाणा/ रविंद्र गव्हाळे) आपण शोले स्टाईल टाकीवरचे आंदोलन पाहिले असेल..परंतु मलकापुरात आंदोलकांनी मागण्यार्थ चक्क तहसील चौकात असलेल्या टावरवर आणि काहींनी पिंपळाच्या झाडावर चढून जीव घेणे आंदोलन पुकारले आहे.

मलकापुर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण होत नसल्याकारणाने तरुणआंदोलक चक्क तहसील चौकात असलेल्या टावरवर चढले तर काही पिंपळाच्या झाडावर चढून बसले. मागील अनेक दिवसां पासून आदिवासी कोळी समाजाचे उपोषण सुरू आहे परंतु अद्यापही सरकार आणि प्रशासनाला जाग न आल्याच्या संतापाने आज समाजातील तरुणांनी आपल्या जीवाची परवाना न करता तहसील कार्यालयाच्या आवारातील टावर वर चढून सरकारचा व प्रशासनाचा जाहीर निषेध केला.आदिवासी कोळी समाजांच्या बांधवांनी मलकापूर ते मुक्ताईनगर स्थित असलेल्या उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन आंदोलन केले व दीड ते दोन तास रस्ता सुद्धा बंद ठेवला तरीसुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.तालुक्यातील आमदार आमदार राजेश एकडे यांना या बाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली व आपल्या परीने लवकरात लवकर समाजाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन सुद्धा आमदार राजेश एकडे यांनी दिले.

▪️काय आहेत समाजाच्या मागण्या? 

आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्रं न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे. जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली तपासणी तात्काळ थांबवावी. शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे. तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांनी निर्गम उतारा व पालकांची जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!