spot_img
spot_img

अरे! हे काय बोलून गेले आजी आमदारांना माजी आमदार? -‘कार्यालयाला अड्डा म्हटले नंतर म्हणाले माफ करा!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘पोलीस, आमदार संजय गायकवाड यांची गाडी धूत असल्याच्या प्रकरणाची’ पाठ माजी हर्षवर्धन सपकाळ सोडायला तयार नाहीये! याबाबतची प्रतिक्रिया मीडियासमोर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाड यांच्या कार्यालयाला अड्डा म्हणून शब्द मागे घेतलाय.दरम्यान सदर प्रकरणाची शहानिशा व्हावी अशीप्रशासनाला विनंती केली आहे.

‘हॅलो बुलढाणा’ व पत्रकारांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असून बातमीत शब्दशः त्यांचेच शब्द आहेत. ते म्हणाले की,जी काही सदर घटना घडली आहे त्या घटनेची शहानिशा व्हायला हवी. त्यांच्या कार्यालयात आणि परिसरात सीसीटीव्ही आहेत.आमदार संजय गायकवाड माझे राजकीय विरोधक जरी असले व मागच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो जरी असलो तरी ते बुलढाणा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहेत.ज्यांनी मतदान केले त्यांचे पण आणि ज्यांनी वोट दिले नाही त्यांचे पण ते लोकप्रतिनिधी आहेत.मात्र या आमदाराबद्दल बेताल वाचाळवीर म्हटल्या जात असेल तर ती आमची ही बदनामी आहे. बुलढाणा मतदार संघाची देखील बदनामी आहे.ही बदनामी थांबली पाहिजे..पोलिसाने उलटी केली असेल तर ती सीसीटीव्ही मधून पुढे येईल.त्यामुळे ताबडतोब त्यांनी त्यांचा जो अड्डा आहे ‘माफ करा’ त्यांचं जे कार्यालय आहे त्यातील सीसीटीव्ही व्हायरल करावेही विनंती आहे.उलटी झाली असेल तर ती विरुद्ध बाजूने जाते, नंबर प्लेटला जाते हे पण आश्चर्यच आहे,असेही माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!