बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदारकीच्या भुताने झपाटलेल्या सिद्धार्थ खरात यांना मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ‘उबाठा’ कडून म्हणजेच महाविकास आघाडी कडून तिकीट निश्चित झाल्याचा हास्यस्पद दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जातोय. एकापेक्षा एक दिग्गज नेते असल्यानंतर कवडीचा जनसंपर्क नसलेल्या खरातांची अशी बातमी पेरणे कितपत योग्य आहे?शासनाचे सहसचिव पद सोडून बक्कळ पैसा खोऱ्याने ओढावा आणि राजकारणातून अब्जाधीश होण्याचे स्वप्न पाहावे आणि हाती येईल तो झेंडा घ्यावा,अशी तयारी खरातांची दिसून येत आहे.
राजकारणात प्रचंड पैसा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले.निवडणुकीच्या तयारीला लागले.जवळ कार्यकर्त्यांचा दुष्काळ असला तरी,नाहकच खेडोपाडी जाऊन गाठीभेटी,सांत्वन भेटी,बैठका,कार्यक्रम घेतल्या जातोय.ऑनलाइन प्रचारातूनही ‘मीच होणार आमदार’ अशी बढाई केली जातेय.निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहणे चुकीचे नाही परंतु राजकारण करीत असताना एक स्ट्रॉंग नेटवर्क तयार करावा लागत असतं!लोकांना जोडावा लागत असतं आणि संपर्क वाढवावा लागत असतो.एवढे असूनही जमत नाही तर योग्य विचारसरणी,
संयम,कोणत्याही समस्येला तोंड देता आले पाहिजे.परंतु सिद्धार्थ खरात यांच्यात यापैकी एकही गुण दिसत नसल्याची चर्चा असून,त्यांनी नितीन राऊत पशुसंवर्धन मंत्री असताना उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून अन्य उचापत्या करून बक्कळ पैसा कमावला.या फाउंडेशन कडून स्वतःच्या समाजातील एकाही कार्यकर्त्याला स्टॅन्ड केले नाही.शिवाय चळवळीचाही खरा उत्कर्ष करू शकले नाहीत. डोळे फिरतील इतका पैसा काही राजकारणी कमावतात. यावर नेमका खरात यांनी डोळा ठेवून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याचे बोलल्या जात आहे.आता काही खाऊ पत्रकार हाताशी धरून खरात यांच्या ‘मख्खन लगाके’ काही जण बातम्या छापत आहेत. खरात यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून मेहकर साठी तिकीट मिळणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. जे उत्कर्ष फाउंडेशन द्वारा विकास साधू शकले नाहीत ते आगामी निवडणुकीत मेहकर -लोणार विकास आराखड्याचे काम पूर्णत्वास नेण्याची भाषा बोलताहेत.परंतु जनता इतकी दूध खूळी नाही.कारण ‘ये पब्लिक है.. सब जानती है!