बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलडाणा येथील अंगणवाडी कर्मचारी भगिनीच्या आंदोलनाला बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी जाहीर पाठिंबा दिला.
जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे आपल्या विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन (आयटक) च्या वतीने आज दि. ३० रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगितले.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी प्रमाणे दर्जा द्यावा, शासनाला कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ग्रजुटी लागु करून तसा जि आर काढण्यात यावा या अंगणवाडी भगिनिंच्या प्रमुख मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहचवून या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करू. आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण शक्ती पणाला लाऊन त्या मागण्या पूर्ण करणार असल्याचेही शब्द जालिंदर बुधवत यांनी उपस्थित महीला भगिनी यांना दिला. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, की से तालुका प्रमुख अशोक गव्हाणे, एकनाथ कोरडे, आशिष बाबा खरात, मोहम्मद सोफियान, अनिकेत गवळी, गणेश सोनुने, राहुल जाधव, अनिल राणा, अनिल दळवी, वसंता सुरडकर, गोविंद दळवी, आकाश मांटे, किरण दराडे यांची उपस्थिती होती.