देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील असंख्य लाभधारक शेतकरी हे पीएम. किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. लाभ न मिळत असलेल्या शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेत समाविष्ट करून त्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आज 29 ऑगस्ट रोजी जय शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष जहीरखान पठाण यांनी देऊळगाव राजा तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, तालुक्यातील अनेक शेतकरी पी.एम.किसान योजनेपासून वंचित राहत असून याकडे संबधित कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. लाभपासून वंचित राहत असलेल्या शेतकऱ्यांचे नावे तातडीने पी.एम. किसान योजनेत समाविष्ठ करून लाभ देण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देखील देण्यात आला आहे.या निवेदनावर जय शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष जहीरखान पठाण,अजमत खान पठाण, शंकर वाघमारे,मुबारक चाऊस, अनिस शाह, राजू गव्हाणे,अयुब शाह, संतोष हिवाळे,राजू शेख राजेश भाग्यवंत आदीच्या स्वाक्ष-या आहेत.