spot_img
spot_img

‘साऱ्या जगा मध्ये कुठं भी जाय रं.. माझ्या भिमाचा दरारा हाय रं!’ -डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे विधिवत पूजन! -आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते स्थापना!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) फटाक्यांच्या आतिषबाजीत व प्रचंड जल्लोषात आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची शहरात आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली.

बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे स्मारकस्थळी विश्वरत्न,परमपूज्य,बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन झाल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते पुतळ्याचे विधिवत पूजन करून पुतळा स्मारकस्थळी बसविण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सर्व सन्माननीय सभासद सदस्य तसेच समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!