रायपूर (हॅलो बुलढाणा/ सचिन जयस्वाल) रायपुरात मजा भक्तीभावाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. श्री हनुमान चालीसा मंडळ सदस्य व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित रायपूर येथील सेवेकरी भाविक भक्तांनी हा जन्माष्टमी सोहळा उत्साहात पार पाडला. दरवर्षी हा उत्सव श्रावण मासला अष्टमी तिथीला साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम घेणारे सेवेकरी सागर इंगळे, प्रेम काळे, हरिश्चंद्र बसवाल, अश्विन देशमाने, अविनाश फोलाने, विनायक घाडगे, सागर बावस्कर, गणेश देशमाने, गजानन जंजाळ, समर्थ जंजाळ, अक्षय शिरसाट व अनिल राजपूत यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी पार पडला.
- Hellobuldana