spot_img
spot_img

आमदार गायकवाड यांची गाडी धूतांनाचा व्हिडिओ व्हायरल! -पोलिसांचे कर्तव्य काय आणि ते करतात काय?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी गाडीची स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल केला आहे.दरम्यान ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा प्रश्नही सपकाळांनी केला आहे.

पोलीस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.
‘पोलीस विभाग आणि राजकारण याचा वरकरणी एकमेकांशी काहीही संबंध नाही; परंतु त्यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे. राजकारणाचा संबंध सर्वच सरकारी यंत्रणांशी असतो. त्यामुळे तो पोलीस विभागाशीही येतो.अलीकडे आमदारांची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली जाते. असाच आमदार संजय गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेला एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धूत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल करून पोलीस कर्मचारी आमदारांच्या दिमतीला असे सुचवून महाराष्ट्राचे काय होणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!