बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आज 28 ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला.
हकीकत अशी आहे की, एका तरुणाला आरोपी किरण भिसे व दत्ता सुरोशे यांनी पैशांसाठी तगादा लावून व शेती नावावर करून देण्यासाठी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशा आरोपावरून आरोपी यांच्यावर खटला चालला.सदर प्रकरणात साक्ष पुरावे व आरोपींचे विधीज्ञ यांचा प्रभावी युक्तिवादयाची अवलोकन करून वि. सत्र न्यायाधीश श्री व्ही. मुगळीकर यांनी आरोपींना निर्दोष मुक्त केले.आरोपी तर्फे ॲड निलेशकुमार सवडदकर यांनी कामा पाहिले.त्यांना अविनाश हिवाळे,सागर सवडदकर, जयसिंग यांनी मदत केली.