देऊळगांव मही (हॅलो बुलढाणा / संतोष जाधव) गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांच्या संकल्पनेतुन महात्मा गांधी गांव तंटामुक्त अभियान राज्य सरकारने सुरु केले. देऊळगाव मही ग्रामपंचायत कार्यलयासमोर आज 27 ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते डीगांबर शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली तर सरपंच कमलताई उमेश शिंगणे, ग्रामविकास अधिकारी व्ही.के.चेके यांच्या प्रमुख उपस्थित ग्रामसभेचे प्रामुख्याने विषय मांडण्यात आले. तंटामुक्ती अध्यक्षपदी भास्कर अण्णा शिंगणे तर उपाध्यक्षपदी सुरेश झिने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ईच्छुकांनी लेखी स्वरूपात अर्ज सादर केले होते.यामध्ये भास्कर अण्णा शिंगणे, अमोल तेजराव शिंगणे, सुरेश झिने, बबन झिने या चार जणांचे नाव समोर आले होते. अध्यक्ष पदासाठी भास्कर अण्णा शिंगणे यांची बिनविरोध निवड व्हावी म्हणून माजी तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित शिंगणे यांनी सूचक नाव सुचविले तर शिवसेना नेते संभाजीराजे शिंगणे यांनी त्याला अनुमोदन दिले. गावातील तंटे (भांडण ) गावातचं मिटवावे यासाठी ग्रामपातळीवर तंटामुक्ती समिती कार्य करत असतेय पोलीस प्रशासनासह न्यायव्यवस्थेवर कुठलाही भार पडू नाही म्हणून तंटामुक्तीचे कार्य हे महत्वपूर्ण ठरतेय. या ग्रामसभेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, राष्ट्रवादी नेते गजेंद्र शिंगणे,माजी सभापती नितीन शिंगणे,माजी सरपंच रामा म्हस्के,सुभाष शिंगणे,तुकाराम महाराज शिंगणे,उपसरपंच मो आशिक,सुनिल मोरे,वसुदेव पाटील शिंगणे,धर्मराज खिल्लारे,तुळशीराम पंडित, रविंद्र इंगळे,संदीप राऊत, संजय खरात,मो. कलीम, सुभाष इंगळे, शेख. मुस्लिम,रमेश नाना शिंगणे,अंनथा इंगळे, संतोष शिंगणे, रवि मुळे,सय्यद सईद,बळीराम शिंगणे,देवा शिंगणे,सचिन नागरे,निखिल शिंगणे, शिवा म्हस्के, गजानन वायाळ,यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.