बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या पाऊस आहे.. गावाजवळ नदी आहे..परंतु खैरखेडा हे गाव केवळ एका विहिरीवर अवलंबून असून ग्रामस्थांना तुडुंब भरलेली नदी ओलांडून पाणी भरावे लागत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आलाय.तसा गावात मूलभूत सुविधांचा दुष्काळ पाचवीलाच पूंजलेला असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी 8 दिवसात समस्यां न सुटल्यास आझाद हिंदचे अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांच्यासमोर ‘रास्ता रोको’चा निर्धार व्यक्त केलाय.
मोताळा तालुक्यातील राजुर घाटातील मधोमध वसलेलं खैरखेड गाव समस्यांच्या विळख्यात सापडले.मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याची एकच विहिर आहे. सदर विहिरीवर गावाबाहेर नदीपात्र ओलांडून जावे लागते. नदी खोलीकरणामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि पाणी वाढले. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वाहत्या पाण्यातून नदी पार करावी लागते. सदर नदीवर ये-जा करण्यासाठी आत्यावश्यक पुलाची मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधितांकडे केली.
तर आजही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना नदीच्या पात्रातून प्रसंगी पुरातून मार्ग काढत पिण्याचे पाणी भरावे लागत आहे. दरम्यान मागील दोन महिन्यात गावातील आठ ते दहा महिला पाणी भरता भरता पडल्या आणि त्या दुखापतग्रस्त झाल्या. रस्ते नाही. पूरेशी लाईट नाही. रस्ते नसल्यामुळे एसटी नाही. विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी ही ससेहोलपट होत आहे. शासन प्रशासनाला निवेदन तक्रार देऊन काही उपयोग झाला नाही. आज 27 ऑगस्ट ला अँड रोठेंना यांच्यापुढे ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला.दरम्यान आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी खैरखेड गावाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.आठ दिवसात समस्या सोडवाव्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.