बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर आमदार-खासदार उपस्थित होते.पंतप्रधान यांनी उदघाटन केलेला हा पुतळा आज कोसळला, ज्याअर्थी वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्या पुतळ्याचे काम अगदीच निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे हा जनतेचा विश्वासघात आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले? यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. ज्यांना महाराष्ट्राची अस्मिता सांभाळता येत नाही असे लोक सत्तेत आहेत ,याचा जाब जनता नक्कीच विचारेल.असेही गायत्री शिंगणे म्हणाल्या.