बुलढाणा (हॅलो बुलढाणा)शासकीय पदावर कार्य करतांना कर्तव्य अपेक्षितच असते पण कर्तव्याची जाण ठेवताना समाजभान आणि सत्त्व सांभाळणेही महत्वाचे आहे. अशी कर्तव्यनिष्ठा जपणारे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने सेवानिवृत्त होताहेत. या अनुषंगाने बुलढाणा अर्बन परिवाराने समाज जाणिवेतून त्यांचा 31 ऑगस्टला सेवानिवृत्ती सोहळा आयोजित केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने (भा.पो.से.) यांनी आपली कारकीर्द गाजविली.अशा खाकी वर्दीचा सन्मान कायम राखत झालेल्या त्यांच्या वाटचालीचा गौरव करणं हे समाजाचं कर्तव्य ठरतं. म्हणूनच रौप्य महोत्सवी कारकिर्दीला सुवर्ण झळाळी देणाऱ्या एसपी सुनिल कडासने यांचा सेवानिवृत्ती सोहळा बुलढाणा अर्बन परिवाराने सांस्कृतीक भवन, सहकार विद्या मंदिर येथे 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रामनाथ पोकळे (भा.पो.से.) मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती हे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) मा.जिल्हाधिकारी,बुलढाणा,
श्री. विश्व पानसरे (भा.पो.से.) मा. पोलीस अधिक्षक राहणार आहेत.कार्यक्रमा नंतर स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.