बुलढाणा (हॅलो बुलढाणा) डॉक्टर…… जरा दुरूनच…डॉक्टर आत्ताच शिकार केली. जरा ताव मारू द्या… बरं जाऊ द्या. पहिले तुम्हाला ऐट बाज पोज देतो.. नंतर शिकारीवर ताव मारतो! असा बिबट्या खरंच म्हणाला असेल का हो? ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्याने नील गाईची शिकार करताना साधलेला हा संवाद जरी काल्पनिक वाटत असला …तरी प्रत्यक्षात फोटो काढतांना कदाचित बिबट्याच्या मनातील भावना अशाच असतील…? शनिवारी सकाळी बुलढाण्यापासून जवळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ. गजेंद्र निकम यांनी आपल्या कॅमेर्याच्या टेली लेन्सने ही बिबट्याची छबी टिपली आहे.